क्षेत्रमाहुली
Friday, May 29, 2015
Thursday, May 3, 2012
Monday, June 21, 2010
कृष्णाबाई
THIS PILIGRIM CENTRE IS ON THE BANK OF KRUSHNA RIVER AND VENNA RIVER ABOUT 6 KM FROM HISTORICAL CITY SATARA.TEMPLES OF HINDU DEITIES LIKE KASHIVISHESHWAR , BILVESHWAR , SANGAMESHWAR AND RAMESHWAR ARE BUILT BY SHRIPATRAO PANTAPRATINIDI OF AUNDH PRINCELY STATE.
क्षेत्र माहुली तीर्थक्षेत्र सातारा शहरापासून ६ किलोमीटर आहे . सातारा रेल्वे स्टेशन पासून फक्त अर्धा किलोमीटर आहे. पोवई नाक्या पासुन रिक्षा व बस मिळते.
अक्षय्यतृतीयेला कृष्णाबाई उत्सवाची मुहूर्तमेढ रोवतात। वैशाखात एकादशी ते चतुर्दशी हे चार दिवस उत्सव धूम धडाक्यात असतो।
क्षेत्र माहुली वर्णन
क्षेत्र माहुली वर्णन
माहुली गाव पवित्र असे हो क्षेत्र कृष्णातीर/ गाव असे उंचावर/ राष्ट्रात नाव गाजले/ स्मरण राहिले विद्वानांचे रामशास्त्री प्रभूण्यांचे /तीराला घाट सुंदर रामेश्वर संगमेला तीरी वसे बिल्वेश्वर/ मन ध्यास होऊ निजा मिजा बद्रीनारायण तो पहा/ ते स्थळ असे निर्मळ नका करू वेळ निघा नाही तिथे क्लेश चिंता/ कृष्णा वेळणा वरुनी आली/ आनंदली पितांबर ल्याली मनोहर /असे हो क्षेत्र कृष्णातिर //१//
नागेश महाराजा वसती/ भक्ता सांगती आत्मज्ञान/ नाथुशास्त्रींचे पाहती मन/ नसे अंत दिसती बघा/ मुळचे निर्गुण ब्रम्ह कुळीचे /भागवत सप्तकार ग्रंथ हा थोर आज्ञा केली/ ती प्रथा चालु झाली/ १९१० साली सुरवात केली/ वाचण्याची आहे तयारी/ हयातीची स्थळ सुशोभित हो किती /हो किती/ कृष्णाबाई पुढे वाहती/ वाहती/ लोकांची भक्ती हो अंती/ हो अंती/ ती वाणी प्रेमळ किती/ लोक हो ऐकती स्तुती हो करिती घरोघर //२//
आंब्याचे तोरण बांधिले/ खांब सजविले कर्दळीचे/ तिथे आसन शास्त्रीजींचे/ आधी पुजन गणपतीचे करी ग्रंथाचे नमन झाले धेनुसह कृष्ण आले/ श्री तुळस पुढे ठेविती/ नारळ अर्पिती /श्रोतेजन येती दर्शनासी/ ते बसले सप्ताहासी/ प्रल्हादाचा छळ तो झाला/ कश्यपुवधाला/ नारळ फुटला/ नरसिंहाला हा दिन तिसरा आला /चार दिवस ग्रंथ ऐकिला/ ऐकिला /तो गोवर्धन सजविला/ सजविला/ नारळ करू वधाला/ वधाला /गोपाळांचा गोपाळकाला गोड हो झाला/ घरोघरीच्या वस्तु आणिल्या/ कृष्णा अर्पिल्या /शिदोरी आली सुदाम्याची/ कृष्ण बोले रुख्मिणीसी/ काल्याची शोभा वर्णिती/ देव ऐकती/ स्तुती ऐकती /स्वर्गावर //३//
नाथुशास्त्री पंडिताची/ गोडी वर्णनाची अनिवार वाटे ऐकावी वारंवार/ श्रोत्यांना पाजी अमृत वाटे धन्यता जीवनाची/ द्या शक्ती पचविण्याची/ फुलांचे हार घालती/ दीप लाविती/ शोभा हो किती दिसे फार/ विठ्ठल रखुमाई पाटावर/ नाना पारिका रंगवलेल्या वेलिका/ उदबत्ती करपूर दीपिका/ दीपिका/ नैवेद्याला प्रिय कृष्णाला दुध शकरी पेला भरीला नारळ प्रसादाला/ करी त्यांना नमस्कार वारंवार मस्तकावर ठेवी कर/ हे क्षेत्र कृष्णातिर //४//
राहिले दोन दिवस मनी उल्हास श्रोती यांच्या दिन आला समाप्तीचा/ वाचता आळस नाही कुठे हो कधी/ मन निग्रही पंडितांचे/ अनुग्रही महाराजांचे प्रासादिक वाणी गोड/ लाविले वेद सप्ताहाचे/ दिन गेले आनंदाचे/ चाले आरती/ जन हो येती मिरवत नेती /वाजे वाजंत्री आनंदले आशीर्वाद सर्वा दिधले /कित्येकांनी आहेर केले/ दांपत्य पुजीयेले/ पुजीयेले/ विडा दक्षिणा बोळविले/ बोळविले/ आशीर्वाद एकची हवा उभयंता द्यावा/ भक्तीचा वर द्यावा/ हे क्षेत्र कृष्णातिर //५//
कृष्णाबाई उत्सवाची मुहूर्तमेढ क्षेत्र माहुलीचे
इनामदार दामोदर गो चावरे यांनी स्वातंत्र्यानंतर रोवली. चार वर्षे कृष्णाबाई
उत्सव यांनी स्वतःच्या घरात चालू केला.

Saturday, June 19, 2010
Wednesday, June 16, 2010
माहुली उत्सव
Subscribe to:
Posts (Atom)